वासोळे हे गाव सातारा जिल्ह्यातील वाई तालुक्याच्या डोंगर कपारीत कमळ
गडाच्या पायथ्याशी आणि कमंडलू आणि कृष्ण नदीच्या सानिध्यात वसलेलं ,
छत्रपती शिवरायांच्या पद स्पर्शाने पावन झालेलं त्या काळच एक छोटास गाव.
पण सन 1980 साली एका जनहितार्थ प्रकल्पासाठी आपल्या खेळत्या अंगना मधून
भविष्याची कपोलकल्पित स्वप्न उराशी घेऊन सातारा शहराच्या अगदी जवळ एका
छोट्याश्या माळ रानावर विस्थापित झाले..
Vasole.in
http://www.vasole.in/saptaha/
Vasole.in
पारीतोषक
वासोळे गावाला मिळालेले पुरस्कार- भारत सरकार निर्मल ग्राम पुरस्कार २००६ तत्कालीन राष्ट्रपती मा. श्री ए. पि. जे. अब्दुल कलाम. यांच्या हस्ते.
- महाराष्ट्र शासन तंटा मुक्त ग्राम पुरस्कार २००८ तत्कालीन ग्रामविकास मंत्री मा. श्री जयंत पाटील यांच्या हस्ते.
- महाराष्ट्र शासन संत गाडगे महाराज ग्राम स्वच्छता अभियान पुरस्कार २००८.
- महाराष्ट्र शासन राजमाता जिजाऊ कुपोषण मुक्त ग्राम पुरस्कार २०१२ .
- महाराष्ट्र शासन पर्यावरण विकास रत्न पुरस्कार २०११ .
- महाराष्ट्र शासन राजमाता जिजाऊ स्वावलंबन पुरस्कार २००९.
- महाराष्ट्र शासन विकास रत्न पुरस्कार २०१३ .
सप्ताह
संतांची परंपरा असणाऱ्या या महाराष्ट्राच्या मातीत आध्यात्माचा वारसा हा ओघाने आलाच पण त्याची जपणूक आणि पुढच्या पिढीला हे धर्म संस्कार रुजवण्याचे काम गेली ३७ वर्ष आपल्या गावात केली जात आहे . आमृतात हि पैजा जिंकणाऱ्या माझ्या मराठी भाषेची थोरवी संत ज्ञानेश्वरांनी अशी काही सांगितली की इथली माती विठ्ठल मय होऊन गेली . याचाच परिणाम दर वर्षी सांप्रदायिक पारायणात ७ दिवस कीर्तन , भजन , प्रवचन या मध्ये सर्व वातवरण भक्ती मय होऊन जाते.http://www.vasole.in/saptaha/
No comments:
Post a Comment