Saturday, March 28, 2020

शेवटी मैत्रीचं प्रेम ..

मानलं कि मी बावळट आहे ...
पण इतकं पण नाही कि शून्य आहे ...
गणित भले कच्च असेल माझं ...
पण इतिहास माझा पक्का आहे ...

रुसणं-फुगणं जमतंय तुला भारी ..
एक्दमच लय भारी ...
त्याच गोष्टीवरून कितीचं फिदा हायेत सारी ..
पण आपण बी कमी नाही ...

तुला हसवणार बी आणि मनवनार बी...
पण मनाचा कोपरा सांभाळून ..
कारण माज्यासाठी तो खूप महाग झालाय..
म्हणूनच काई मला परवडला नाय ..

पण असच जाऊस वाटत पण नाय .
जाईल ना आज ना उद्या ..का इतकी घाई हाय ..

शेवटी मैत्रीचं प्रेम हाय...
संपणार तरी प्रेमात ...
राहणार तरी प्रेमात..

शेवटी मैत्रीचं प्रेम ..

मानलं कि मी बावळट आहे ... पण इतकं पण नाही कि शून्य आहे ... गणित भले कच्च असेल माझं ... पण इतिहास माझा पक्का आहे ... रुसणं-फुगणं जमतंय ...