एक लहान मुलगा छोटाश्या झोपडीत राहायचा .. त्या समोर एक मोठा बंगला होता ...
एक दिवस चुकून तो त्याच्या कापसाच्या बाहुली सोबत त्या बंगल्या मध्ये गेला...
त्याला तिथे एक काचेची बाहुली दिसली.. ती त्याला खूप आवडली .. तो दिवसभर तिच्याशीच खेळात बसला..
कापसाची बाहुली मात्र सगळं बघतच होती.. ती बाहुली निघून गेली..
तो एवढा प्रेमात पडला त्या काचेच्या बाहुलीच्या कि त्याला कळलंच नाही कि वेळ संपेल तास बंगल्याचे दार बंद होतील.. मग त्याला निघून जावं लागेल तिला सोडून...
तो त्याच्याच धुंदीत जगात होता .. वेळ संपत आली होती .. खेळता खेळता त्या मुलाला ठेच लागली आणि तो पडला ... त्याला लागलं पण त्या काचेच्या बाहुलीला काही नाही झालं. कारण ती पूर्ण आत्मविश्वासाने भरली होती.. तिला वेळ आणि शेवट याची कल्पना होती ...
वेळ संपली.. त्या मुलाला बंगल्या बाहेर काढलं.. बिचारा खूप रडला.. दयावया करू लागला ..
जीव जडला होता ... ती त्याला काचेतुनच बघत राहिली ... तिचा हि जीव लागलाच होता त्याच्या मध्ये ..
तो परत त्याच्या कापसाच्या बाहुलीकडे परतला..
दुसऱ्या दिवशी एक राजकुमार आला .. त्या काचेच्या बाहुलीला घेऊन गेला ..
घेऊन जाताना त्या काचेच्या बाहुलीने त्याच्या कडे बघितली आणि त्याने तिला बघितलं ... ते शेवटचंच ...
--
ज्या गोष्टीच आपण हक्कदार नसतो ..
त्या गोष्टीसाठी झुरणं ..
म्हणजे वेड प्रेम..