Saturday, March 28, 2020

शेवटी मैत्रीचं प्रेम ..

मानलं कि मी बावळट आहे ...
पण इतकं पण नाही कि शून्य आहे ...
गणित भले कच्च असेल माझं ...
पण इतिहास माझा पक्का आहे ...

रुसणं-फुगणं जमतंय तुला भारी ..
एक्दमच लय भारी ...
त्याच गोष्टीवरून कितीचं फिदा हायेत सारी ..
पण आपण बी कमी नाही ...

तुला हसवणार बी आणि मनवनार बी...
पण मनाचा कोपरा सांभाळून ..
कारण माज्यासाठी तो खूप महाग झालाय..
म्हणूनच काई मला परवडला नाय ..

पण असच जाऊस वाटत पण नाय .
जाईल ना आज ना उद्या ..का इतकी घाई हाय ..

शेवटी मैत्रीचं प्रेम हाय...
संपणार तरी प्रेमात ...
राहणार तरी प्रेमात..

Sunday, March 8, 2020



Image result for missing wallpaper



Pata nahi kya tumne socha humare liye...
Socha to acha hi hoga..
Dil se jo chaha he tumhe.. 
Huwa to acha hi hoga..

Tuje akelapan pasand aaya..
to thik he..
Humse akelapna hi sahi..
Yaad aaye to lot aana..
Hum wahi pe milenge..
jaha se aapne pukara chod diya tha..

- Suryakant Ubhe

Sunday, January 26, 2020

काचेची बाहुली...



एक लहान मुलगा छोटाश्या झोपडीत राहायचा .. त्या समोर एक मोठा बंगला होता ...
एक दिवस चुकून तो त्याच्या कापसाच्या बाहुली सोबत त्या बंगल्या मध्ये गेला...

त्याला तिथे एक काचेची बाहुली दिसली.. ती त्याला खूप आवडली .. तो दिवसभर तिच्याशीच खेळात बसला..
कापसाची बाहुली मात्र सगळं बघतच होती.. ती बाहुली निघून गेली..

तो एवढा प्रेमात पडला त्या काचेच्या बाहुलीच्या कि त्याला कळलंच नाही कि वेळ संपेल तास बंगल्याचे दार बंद होतील.. मग  त्याला निघून जावं लागेल तिला सोडून...

तो त्याच्याच धुंदीत जगात होता .. वेळ संपत आली होती .. खेळता खेळता त्या मुलाला ठेच लागली आणि तो पडला ... त्याला लागलं पण त्या काचेच्या बाहुलीला काही नाही झालं. कारण ती पूर्ण आत्मविश्वासाने भरली होती.. तिला वेळ आणि शेवट याची कल्पना होती ...

वेळ संपली.. त्या मुलाला बंगल्या बाहेर  काढलं.. बिचारा खूप रडला.. दयावया करू लागला ..
जीव जडला होता ... ती त्याला काचेतुनच बघत राहिली ... तिचा हि जीव लागलाच होता त्याच्या मध्ये ..

तो परत त्याच्या कापसाच्या बाहुलीकडे परतला..
दुसऱ्या दिवशी  एक राजकुमार आला .. त्या काचेच्या बाहुलीला घेऊन गेला ..

घेऊन जाताना त्या काचेच्या बाहुलीने त्याच्या कडे बघितली आणि त्याने तिला बघितलं ... ते शेवटचंच ...

--
   ज्या गोष्टीच आपण हक्कदार नसतो ..
   त्या गोष्टीसाठी झुरणं ..
   म्हणजे वेड प्रेम.. 

Wednesday, January 22, 2020

मंजिल तो किनारों पे हि थी





प्यार भुला नही जाता, दबाया जाता हे ..
इश्क वो दर्या हे जिसमे डुबा नही जाता तेरा जाता हे ...

जो डूब गये सो गये, उन्हे  मंजिल नही मिलती ...
मंजिल उन्हे मिलती हे जो जिद्द पे अडे रहते हे..  



Wednesday, July 6, 2016

निसर्गाचा नियम सगळ्यांना सारखाच !!!


एकदा एका जंगलात एक हरीणी बाळाला जन्मं देणार असते.

पण ती ज्या ठीकाणी बसलेली असते तिथे जवळच एक वाघ तिच्यावर नजर ठेवून असतो.

एका बाजूला एक शिकारी तिच्यावर बंदूक रोखून उभा असतो. आणि जवळच जंगलात वणवा पेटलेला असतो.

सगळ्या बाजूने दिसणार्या या संकटांपैकी एकतरी संकट तिला गिळून टाकेल याची तिला खात्री असते.

तो शिकारी बंदुकीतून गोळी सोडतो....वाघ जोरात झेप घेतो...आणि तितक्यात वीज चमकते...त्या शिकार्याचं लक्षं वेधलं जातं... आणि ती गोळी त्या वाघाला लागते...वीज चमकून गडगडाट होतो आणि पाऊस सुरु होतो... त्यामुळे वणवाही विझतो...

आणि

या सगळ्या गोष्टी होत असताना ती हरिणी हळूच एका लहानश्या हरणाला जन्मं देते...

माणसाचं आयुष्य हे असंच असतं...

त्याच्या हातात काहीच नसतं...

आपण फक्तं प्यादी असतो या पटावरची...

कर्ता करविता असतो तो ईश्वर...

एक एक वाटत असताना कुठल्या क्षणी काय होईल काहीच सांगता येत नाही...

मारणाराही तोच असतो आणि तारणाराही तोच...

कर्माचा सिद्धांत हा कीतीही खरा असला तरी शेक्सपिअरचं एक वाक्यं खूप काही सांगून जातं...

'Behind every misfortune there is a crime... But behind every crime there is a misfortune...!'

आयुष्य हे असंच असतं... कुणाला दोष द्यावा आणि कुणाचं कौतुक करावं... दोन्ही एकाच रथाची चाकं...

कुठलं खड्डयात अडकणार आणि कुठलं वर टांगून राहणार हे ठरवणारा मात्र तोच...

'समुद्रात बुडून त्याचा म्रुत्यु झाला'...पण त्याच्या मनातून समुद्राकडे तो त्याक्षणी कसा ओढला गेला? कोण सांगेल?

'चाळीस घरांच्या ढिगार्याखाली गाडलं गेलेलं सहा महीन्यांच बाळ, 30 तासांनंतरही तसच छान हसत खेळत सापडतं'...

त्याला    त्या ढिगार्यातही कुशीत घेणारं कोण असतं?

'नेहमीच्याच रस्त्याने जाणारी एक बस अचानक एक दिवस दरीत कोसळते.'तिला दरीत ढकलणारं असतं कोण? वारा? की ड्रायव्हर? की ड्रायव्हरच्या डोळ्यासमोर अचानक आलेला अंधार? कोण सांगेल?

एका मुलाच्या रोजच्या नेहमीच्या ट्रेनमधे बाम्बस्फोट होतो... पण तो त्यादिवशी ऑफिसला गेलेलाच नसतो... त्यामुळे तो वाचतो...

ऑफिसला न जाण्याची इच्छा त्याला त्याच दिवशी का होते? कोण सांगेल?

त्या हरिणीच्या बाळाचा जन्मं होताना अचानक वीज का चमकली?कोण सांगेल? कोण सांगेल कोण??कुणीच नाही...
हे असंच असतं... भक्तीने रुजवलेलं ... प्रेमाने सावरलेलं... आसक्तीने बुडवलेलं... कर्माच्या चक्रात अडकलेलं...ईश्वराने लिहीलेलं ... आपलं आयुष्यं...!

मोर नाचताना सुद्धा रडतो... आणि..राजहंस मरताना सुद्धा गातो....

दुःखाच्या रात्री झोप कुणालाच लागत नाही...आणि सुखाच्या आनंदात कुणीही झोपत नाही.

यालाच जीवन म्हणतात.

किती दिवसाचे आयुष्य असते?आजचे अस्तित्व उद्या नसते,मग जगावे ते हसून-खेळूनकारण या जगात उद्या काय होईलते कोणालाच माहित नसते...!!
 नशिबाने दिलेल्या पदाचा गैरवापर करू नका..... 
कोणाचा  अपमान करू नका आणि कोणाला कमीही लेखू नका.....
-  तुम्ही खूप शक्तिशाली असाल,
पण वेळ ही तुमच्यापेक्षाही शक्तिशाली आहे.....
- कोणी कितीही महान झाला असेल,
पण निसर्ग कोणाला कधीच लायकीपेक्षा महान बनण्याचा क्षण देत नाही.......
स्वतःवर कधीही अहंकार करू नकोस......
देवाने तुमच्या-माझ्यासारख्या किती जणांना मातीतून घडवलं आणि मातीतच घातलं......
          

    -स्वामी विवेकानंद

Friday, July 17, 2015

Marathi Vinod

मन्या पाटील लंगडत लंगडत शाळेत ऊशीरा पोचला.
इंग्रजीचे सर ओरडले."व्हाय आर यू लेट?"
इंग्रजीत सुमार मन्या म्हणाला, "सर रस्त्यावर चिख्खल झाला होता आणि तिथे उभ्या बैलाने ढुशी मारली. माझा पाय मोडला. म्हणून ऊशीर झाला."
सर पुन्हा ओरडले, "टॉक इन इंग्लिश!"...
हजरजबाबी मन्याने म्हटले,"सर देयर वॉज चिखलीपिकेशन ऑन रोड. काऊज हसबण्ड केम. ह...ी मारिंग मी शींगडा मेड मी लंगडा. सो आय कम लेट!"

 ==================================================================


गण्या : अरे मित्रा " अरेंज मॅरेज " म्हणजे काय ?
बंड्या : सोप्प आहे रे , समज... तू रस्त्यावरून चालला आहेस आणी अचानक तुला नागीण चावते ..
गण्या : ठीक आहे ...आणी " लव मॅरेज " म्हणजे काय ?
बंड्या : लव मॅरेज " म्हणजे तू त्या नागीण कडे जातो आणी तीला बोलतो " फूस फूस ... चाव ना मला ..चाव .."

रिक्षावाला - बोला साहेब , कुठे जाणार ?
गंपू - नवी मुंबईला.
रिक्षावाला- पण साहेब , कोणत्या क्लासने जायचं ते  सांगा.
गंपू - आं...रेल्वेतला , विमानातला क्लास माहितीय. पण  रिक्षातक्लास म्हणजे काय ?
रिक्षावाला - फर्स्ट क्लासमध्ये म्युझिक चालू आणि खड्डे  चुकवून रिक्षा चालवणार. सेकंड क्लासमध्ये म्युझिक बंद आणि फक्त खड्ड्यातून  रिक्षा चालवणार.
... गंपू - आणि थर्ड क्लास ?
रिक्षावाला - थर्ड क्लासमध्ये मी मागे बसणार  आणि तुम्ही रिक्षा चालवायची...!

 ==================================================================

बंटीच्या घरी आलेले पाहुणे जेवायला बसलेले असताना बंटीमोठ्याने म्हणाला
.
.
.
.
... .
.
.
.
.
“आई, आपल्याकडे आजोबा, आजी आणि आत्या आले आहेत. .
.
.
.
.
.
तू तर म्हणत होतीस की म्हसोबा, सटवी आणि टवळी चरायला येणार  आहेत,
.
त्यांच काय झाल ?




Monday, September 17, 2012

Multiple Columns

-moz-column-count: 3;
-moz-column-gap: 5px;
-webkit-column-count: 3;
-webkit-column-gap: 5px;
column-count: 3;
column-gap: 5px;


column-count and column-width are the two most basic ways to define the properties of a multi-column element.

#multicolumnElement {
    -webkit-column-count: 2;
    -moz-column-count: 2;
    column-count: 2;
}

column-gap

#multicolumnElement {
    -webkit-column-gap: 1em;
    -moz-column-gap: 1em;
    column-gap: 1em;
}

column-rule

#multicolumnElement {
    -webkit-column-rule: 1em solid #000;
    -moz-column-rule: 1em solid #000;
    column-rule: 1em solid #000;
}

column-break

 h2 {
    -webkit-column-break-before:always;
    -moz-column-break-before:always;
    column-break-before:always;
}

Spanning columns

h2 {
    -webkit-column-span:all;
    -moz-column-span:all;
    column-span:all;
}

h3{
    -webkit-column-span:2;
    -moz-column-span:2;
    column-span:2;
}

Filling columns

#multicolumnElement {
    -webkit-column-fill:auto;
    -moz-column-fill:auto;
    column-fill:auto;
}

border radius

-webkit-border-radius: 5px;  /* chrome */

-moz-border-radius: 5px;  /* Moziila*/

border-radius: 5px;  /* Opera and IE 10*/

this is css3.

In box apply the corner reduce the size.

please see below code. and apply your web site.

Copy the code in Notpad and save as this name radius.html and see the magic.

The border-radius property allows you to add rounded corners to elements.

शेवटी मैत्रीचं प्रेम ..

मानलं कि मी बावळट आहे ... पण इतकं पण नाही कि शून्य आहे ... गणित भले कच्च असेल माझं ... पण इतिहास माझा पक्का आहे ... रुसणं-फुगणं जमतंय ...